http://picasion.com/gl/7HxX/

सुस्वागतम! सुस्वागतम!! सुस्वागतम !!! ज्ञानमंथन ब्लॉगवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.

स्टाफ पोर्टल माहिती

 स्टाफ पोर्टला माहिती कशी भरावी या बाबत मार्गदर्शन


कर्मचारी मॅपिंग-


1) शाळेतील कर्मचारी मॅप करतांना यु-डायस अथवा शालार्थ दवारे मॅप करावा. जर कर्मचारी केवळ एकाच ठिकाणी दिसुन येत असल्यास MAP WITH ONLY SHALARTH OR UDIES दवारे मॅप करावा.


2) जन्म दिनांका मध्ये तफावत असल्यास सदरील कर्मचारी मॅप केल्यानंतर Forward / Return to CH (Cluster Head) / URC या मेनुखालील FOREWORD DATA FOR DOB CORRECTION या टॅब दवारे अचुक जन्म तारीख नोंदवून गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगीन ला पडताळणी करीता TRANSFER करावा.


तसेच सदरील कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तिकेची पहिल्या पनाची झेरॉक्स व इयत्ता 10 वी प्रमाणपत्राची झेरॉक्स आपले सरल तालुका समन्वयकांकडे समक्ष अथवा व्हॉटस ॲप दवारे पाठविण्यात यावी. जेणेकरुन गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगीन वरुन जन्म दिनांकाची माहिती तात्काळ दुरुस्त करुन देता येईल.


3) मॅपिंग झालेल्या कर्मचारी फिकट निळया रंगामध्ये दिसुन येतो आणि तोच कर्मचारी DATA UPDATED BY HEAD MASTER मेनु मध्ये दिसुन येतो.


AFTER MAPPING DATA UPDATED BY HEAD MASTER -


मॅप झालेल्या कर्मचाऱ्यांची जन्म तारीखे व्यतीरीक्त इतर माहिती मधील बदल EDITED BY HEAD MASTER मधुन करता येईल. बदल करण्यात आलेली माहिती SAVE करावी.


1) MODE OF GETING POST मध्ये इयत्ता 1 ते 5 शिकवीत असणाऱ्या शिक्षकांसाठी UNDER GRADUATE TEACHER हा पर्याय व इयत्ता 6 ते 8 साठी शिकवीणाऱ्या शिक्षकांकरीता GRADUATE TEACHER हा पर्याय निवडावा.


2) जो कर्मचारी मुख्यायाध्यापक या पदावदर प्रत्यक्ष काम करीत असेल त्यांचेच पद HEAD MASTER हे निवडावे. पदभार असलेल्या कर्मचाऱ्यांने आपले मुळ पद नोंदवावे.

3) SELECT NATURE OF APPOINTMENT मध्ये जि.प व्यवस्थापनाच कर्मचाऱ्यांचे OPEN SELECTION हा पर्याय निवडावा. व निमशिक्षकांसाठी MERGER हा पर्याय निवडावा. इतर व्यवस्थापनाच्या शाळांनी आपणांस लागु असलेला पर्याय निवडावा.

4) AID TYPE मध्ये जि.प.व्यवस्थापनाच शाळांनी AIDED हा पर्याय निवडावा व इतर व्यवस्थापनाच्या शाळांनी आपणांस लागु असलेला पर्याय निवडावा.



TEACHING DETAILS

PERSONAL DETAILS


1) PERSONAL DETAILS मध्ये कर्मचाऱ्यास लागु असलेल्या सर्व तारखा मुळ दस्तऐवजावरुन अचूक भराव्यात.

2) जिल्हाबदलीने आलेल्या कर्मचाऱ्याची DATE OF JOINING CURRENT MANAGEMENT ही या जिल्ह्रयात रुजू झाल्याचा दिनांक टाकावा


3) PAY / PF / DCPS मध्ये PAY COMMISSION मध्ये PAY COMMISSION हे SIIXTH PAY COMMISSION (STATE) हे निवडुन सध्या लागु असलेली वेतनश्रेणी निवडावी


4) PAY IN BAND हा सदर कर्मचाऱ्याचे मुळ वेतन (BASIC) आहे. ते भरावे. GRADE PAY वर निवडलेल्या PAY SCALE प्रमाणे AUTO UPDATE होवून BASIC PAY मध्ये दोघांची बेरीज AUTO UPDATE होईल

5) PAY w.e.f DATE ही ज्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ नियमित आहे त्या सर्वांची दिनांक 01/07/2016 राहील. वेतनवाढ बंद केलेल्या कर्मचाऱ्याची सेवा पुस्तिकेवरुन सध्या वेतन घेत असलेली दिनांक टाकण्यात यावी.

6) RECEIVED SENIOR GRADE SCALE मध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणी मिळाल्याचा दिनांक टाकण्यात यावा. UNTRAINED शिक्षकांच्या बाबतीत सदर दिनांक सेवापुस्तिकेवरुन तापसून घेण्यात यावा

7) RECEIVED SELECTION SENIOR GRADE SCALE मध्ये 24 वर्षानंतर मिळणाऱ्या निवडश्रेणीचा दिनांक टाकण्यात यावा. याठिकाणी लक्षात घ्यावे की, सदर निवडश्रेणी ही प्रत्येक कर्मचाऱ्यांना मिळत नसून जिल्ह्रयातील 20% कर्मचाऱ्यानां देण्यात येते.वेतनश्रेणी मिळाल्याचा दिनांक सेवापुस्तिकेवरुन तापसून घेण्यात यावा.


8) PF / DCPS DETAILS

A) GPF लागु असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी A.C TYPE- GPF, A.C MAINTAINED BY - DEPARTMENT , PF SERIES - ZP  व GPF A.C NO टाकावा.

B) DCPS DETAILS मध्ये A.C TYPE- DCPS, A.C MAINTAINED BY - DCPS , DCPS SERIES - PRN  व PPAN/PRAN मध्ये सदर कर्मचाऱ्याचा DCPS NO टाकावा. सदर नंबर हा आपल्यास शालार्थ बिलातील INNER PAGE वर मिळेल.


9) GIS DETAILS -

A) GIS APPLICABLE हे  STATE GIS निवडुन रुपये 60/- , 120/- वर्गणी असणाऱ्यांनी GROUP - C आणि रुपये 480/- वर्गणी असणाऱ्यांनी GROUP - B निवडावा.

B) MEMBERSHIP DATE-

a) सन 1991 पुर्वीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 01/01/1991 हा दिनांक टाकावा.

b) सन 1991 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी पुढील वर्षाचा 01 जानेवारी हा दिनांक टाकावा.

c) शिक्षण सेवकासाठी सेवेत कायम ( continuation ) झालेल्या वर्षाच्या पुढील वर्षाचा 01 जानेवारी हा दिनांक टाकावा. (प्रथम नेमणूक दिनांकात 4 वर्ष मिळवावेत.)


10) CAST & CERTIFICATION

1) या मध्ये कर्मचाऱ्याचा योग्य तो धर्म, प्रवर्ग अणि जात निवडावी.

2) CERTIFICATION DETAILS जात प्रमाणपत्राचा क्रमांक, मिळाल्याचा दिनांक व लागु असलेले पर्याय निवडावेत.

3) CERTIFICATION VALIDATION DETAILS मध्ये जात वैधता प्रमाणपत्राचा क्रमांक, मिळाल्याचा दिनांक व लागु असलेले पर्याय निवडावेत.



11) INITIAL APPOINTMENT DETAILS मध्ये SOCIAL CATEGORY मध्ये आपणांस मिळालेल्या नियुक्तीचा प्रकार टाकावा. (माजी सैनिक,अंपंग, प्रकल्प / भुकंपग्रस्त, खेळाडू इ.) लागु नसल्यास NOT APPLICABLE निवडावे.

12) ACADEMIC QUALIFICATION DETAILS -


A) ACADEMIC QUALIFICATION DETAILS मध्ये कर्मचाऱ्याची उच्चतम पदवी निवडावी. व सदर पदवीशी सुसंगत माहिती भरण्यात यावी.

B) PROFESSIONAL QUALIFICATION DETAILS मध्ये कर्मचाऱ्याची उच्चतम पदवी निवडावी. व सदर पदवीशी सुसंगत माहिती भरण्यात यावी.


13) SUBJECT TAUGHT DETAILS - मध्ये SUBJECT TAUGHT LEVEL, MEDIUM, CLASS (वर्ग) निवडुन सदर शिक्षक ज्या वर्गांना अध्यापन करीत असलेले सर्व विषय व तासीका (आठवडयाच्या) टाकण्यात याव्यात.

उदा- एखादा शिक्षक इयता 4 थी च्या वर्गांस अध्यापन करीत असेल तर इयत्ता 4 थी संपुर्ण वर्गाच्या विषय निहाय तासिका टाकण्यात याव्यात. (ज्याप्रमाणे आपण SCHOOL PORTAL ला TIME TABLE भरला त्याप्रमाणे)


14) PHYSICALLY HANDICAP DETAILS मध्ये जर कर्मचारी अपंग असल्यास अपंगत्वाचा प्रकार, अपंगाची टक्केवारी, अपंग प्रमाणपत्राचा क्रमांक इ. अनुषांगीक माहिती भरावी. सध्या प्रमाणपत्र अपलोड करण्याची गरज नाही.


15)  DIES QUALIFICATION DETAILS


A) मध्ये गणित, इंग्रजी, सा.शास्त्र कुठल्या इयत्तेपर्यंत शिकलात तो पर्याय निवडुन माहिती SAVE करावी

B) TEACHING LEVEL & MAIN TEACHING SUBJECTS मध्ये कर्मचाऱ्यास लागु असलेली TEACHING LEVEL निवडुन MAIN SUBJECT 1 व 2 मध्ये योग्य ती माहिती नेांदविण्यात यावी.


16) U DIES TEACHING DETAILS मध्ये कर्मचारी कोणऱ्या स्तरापर्यंत कोणते विषय शिकवीतो याची महिती भरणे अपेक्षित आहे.


17) A) U DIES TARING DETAILS मध्ये मागील वर्षी घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील नोेंदविण्यात यावा


B) ACP / SENIOR & SELECTION GRADE TRAINING DETAILS मध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणी व  निवडश्रेणी प्रशिक्षणाची दिनांक टाकण्यात यावी. प्रशिक्षण प्रमाणत्रावरील दिनांक टाकावी

C) OTHER TRAINING DETAILS मध्ये अपंग विदयार्थ्यांकरीता तसेच संगणकाबाबत विशेष प्रशिक्षण घेतल्यास तशी माहिती नमुद करावी.

18) सदर संपुर्ण भरलेली माहिती FORWARD DATA (MENU WISE) या पर्यायातील प्रत्येक TAB निवडुन केंद्रप्रमुखास FORWARD करावी.

महत्त्वाचे

१.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, दिनांक १९ सप्टेंबर २०१६ अनुसार मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या १६२८ खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासंदर्भात नमूद केलेल्या अटी व शर्ती मधील मुद्द्दा क्रमांक ७ अनुसार '' शाळेमधील सर्व शिक्षकांच्या आधारकार्डसह वैयक्तिक मान्यतेचे आदेश सरल प्रणालीत भरणे आवश्यक आहे.


२.त्या अनुषंगाने वरील शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र घोषित केलेल्या १६२८ शाळांना त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यासाठी Staff Portal सुरु केलेले आहे. सदरचे login फक्त शासन निर्णयातील नमूद शाळांसाठीच उपलब्ध केलेले आहे. सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित शाळांसाठी यथावकाश login उपलब्ध केले जातील.

३.सदर १६२८ शाळांनी त्यांच्या शाळातील ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरलेली नाही अशा शाळांनी सदरची माहिती तात्काळ Staff Portal वर भरावी. कोणत्याही कर्मचाऱ्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही याची संबंधित शाळा व शिक्षणाधिकारी यांनी नोंद घ्यावी.


४.एखादया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याचे नाव Map From Udise मध्ये HM Login वर दिसत नसल्यास त्या कर्मचा-याची माहिती भरण्यासाठी Education Officer (Primary/Secondary) Login वर New Entry चे Form उपलब्ध करुन दिला आहे. तरी शाळांनी संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून शिक्षणाधिकारी यांनी पडताळणी करुनच सदरची माहिती भरावी.
५.प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा आधार क्रमांक (UID Number) भरणे Compulsory आहे. तसेच प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या नियुक्तीचे व वैयक्तिक मान्यतेच्या आदेशाची प्रत upload करणे Compulsory आहे. या व्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्रे upload करावयाची नाहीत याची नोंद घ्यावी.


६.शाळेने Staff Portal वर login करून 1.Personal Details 2.Caste and Certification 3.Initial Appointment Details 4.Qualification Details 5.Physically Handicapped Details ह्या 5-Screen वरील माहिती भरणे आवश्यक आहे. सदरची माहिती भरून ती केंद्रप्रमुख यांना Forward करावी.


७.केंद्रप्रमुख यांनी HM login वरून Forward केलेली माहिती तपासून Verify करावयाची आहे.                                    
धन्यवाद


बेटी बचाओ, बेटी पाढाओ!!!